Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रआमिर खानच्या घरावर रेड पडली? एक, दोन नव्हे तर 25 IPS ऑफिसरची...

आमिर खानच्या घरावर रेड पडली? एक, दोन नव्हे तर 25 IPS ऑफिसरची टीम अचानक अभिनेत्याच्या घरी दाखल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट (Bollywood’s Mr. Perfectionist) आमिर खान (Actor Aamir Khan) नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी साठीला टेकलेल्या आमीर खाननं दोन घटस्फोटानंतर आपण तिसऱ्यांदा प्रेमात पडल्याचं जाहीर केलं. त्यानंतर माध्यमांना त्याच्या गर्लफ्रेंडची भेट घडवून दिली. त्यानंतर त्याचा नवाकोरा सिनेमा ‘सितारे जमीन पर’ चर्चेत आला. सगळं काही आलबेल असतानाच आता, पुन्हा एकदा आमिर खान चर्चेत आला आहे, तो एका व्हायरल व्हिडीओमुळे. आमिर खानच्या वांद्र्यातील घराबाहेरच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे.

 

अलिकडेच, मुंबईतील वांद्रे (Aamir Khan Bandra House) येथील आमिर खानच्या घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या गाड्या त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसतायत. असं म्हटलं जातंय की, सुमारे 25 आयपीएस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले होते. आता, आयपीएस अधिकाऱ्यांची एक टीम आमिर खानच्या घरी का आली याची सर्वत्र सगळीकडे रंगली आहे. यावर आमिर खानच्या टीमनं दिलेलं उत्तर मात्र तोंडात बोटं घालायला लावणारं आहे.

 

एक, दोन नाहीतर 25 आयपीएस ऑफिसर आमिरच्या बंगल्यावर

रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, जवळपास 25 आयपीएस अधिकाऱ्यांची टीम आमिर खानला भेटायला त्याच्या वांद्र्यातील घरी पोहोचली. दरम्यान, रिपोर्टमध्ये असंदेखील सांगण्यात आलं आहे की, 25 आयपीएस अधिकारी आमिर खानची भेट घेण्यासाठी गेले होते. पण आमिर किंवा त्याच्या टीमनं याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. पण यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

 

व्हिडीओ पाहिल्यानंतर आमिर खानचे चाहते विविध प्रकारचे अंदाज बांधत आहेत. माध्यमांनी आमिर खानच्या टीमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मात्र धक्कादायक वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की, त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक येण्याचं कारण माहीत नाही. ते म्हणाले की, “आम्ही अजूनही आमिर खानकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -