Sunday, August 3, 2025
Homeसांगलीसांगलीत कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन संपवलं, मानेवर अन् डोक्यात धारदार शस्त्राने जीवघेणा...

सांगलीत कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन संपवलं, मानेवर अन् डोक्यात धारदार शस्त्राने जीवघेणा वार,

इस्लामपूर शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रेकॉर्डवरील गुंडाचा पाठलाग करत त्याची धारदार हत्यारांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही संशयित पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. आर्थिक वादातून ही खुनाची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रोहित पंडित पवार असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. रोहित आणि हल्लेखोरांमध्ये आर्थिक देवघेवीच्या कारणातून वाद होता. त्यातून हल्लेखोर हे रोहित पंडीत पवारच्या मागावर होते. काल (शुक्रवारी, ता-1) तो कारखाना रस्त्यावर असल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्याला गाठलं. आपल्यावर हल्ला होणार याची कुणकुण लागताच रोहितने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर आणि डोक्यात वार केले. डोक्यात वार केल्यावर ते हत्यार रोहितच्या डोक्यातच रुतून बसले होते. त्याच अवस्थेत त्याला दुचाकीवरून रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -