Sunday, August 10, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी: होड्यांच्या शर्यती थरारक क्षण : Video पहा

इचलकरंजी: होड्यांच्या शर्यती थरारक क्षण : Video पहा

9 ऑगस्ट क्रांती दिना निमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसर्‍या वर्षी प्रथम क्रमांक मिळवत चांदीची गदाही पटकविली. तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, कवठेसारच्या युवा शक्ती बोट क्लबने तिसरा आणिर डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत मागील 35 वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 10 बोट क्लबने सहभाग नोंदविला होता.

शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून सर्वांना प्रोत्साहन दिले जात होते. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकिनांनी तसेच महिलांनीही मोठी गर्दी केली होती. प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

याप्रसंगी पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधिक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड, श्रीरंग खवरे, पै. अमृत भोसले, अनिल कुडचे, शेखर शहा, राजू पुजारी यांच्यासह इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळदगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, बजरंग कुंभार, राजू दरिबे, सागर कम्मे, गणेश बरगाले, इरफान अत्तार, वसीम बागवान, शशिकांत नेजे आदींसह मान्यवर व शर्यत शौकिन उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.
इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांचा ‘येथे’ छापा… मिळालं असं काही..

हुपरी परिसर पुन्हा हादरला; तळंदगे येथे पुरलेले अर्भक आढळून आल्याने खळबळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -