श्री पंचगंगा वरद विनरायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्यावतीने अंगारकी संकष्टीच्या पावन सोहळ्याच्या दिनानिमित्त मंगळवारी १२ ऑगस्ट रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कारण्यात आले असून वरदविनायकाच्या भाविकांनी या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर भक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी सकाळी ८ वाजता नित्य आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८:३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अथर्व शीर्ष व इचलकरंजी परिसरातील महिला भजनी मंडळांकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे. वा माध्यमातून भक्तांना पारंपरिक भक्तिसंगीताचा अनुभव घेता येणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत खिचडीच्या महाप्रसादाचे बाटप करण्यात येणार असून भाविकांसाठी प्रसाद वितरण खुल्या स्वरूपात असणार आहे. सायंकाळी ७ वाजता पुन्हा एकदा नित्य आरती होईल. त्यानंतर रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी संकष्टी बंद्रोदयाच्या शुभक्षणी महाआरती होणार आहे. हा सोहळा मतांच्या गर्दनि भारावलेला असणार आहे हा भाविकांसाठी आध्यात्यिक उतीचा मार्ग ठरणार आहे, अशी माहिती मंदिर भक्त मंडळाने दिली.



