शनिवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी ‘आयजीएम’ मधील बालरुग्ण विभागातील बाथरूममध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक शुभम पाटील यांनी अग्निरोधक वापरून तत्काळ आग नियंत्रणात आणली. या विभागात त्या वेळी २१ बालरुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णालयाला भेट देऊन तातडीने बांधकाम आणि फायर ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
बाथरूममध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरक्षा रक्षकाने तत्परतेने अग्निरोधक वापरून आग विझवली. या दरम्यान रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
रुग्णालयाच्या स्लॅबमधून पाणी गळत असल्याने वायरिंगला शॉर्टसर्किट होऊन आग लागली, अशी माहिती अधीक्षक डॉ. भाग्यश्री पाटील यांनी दिली.