Sunday, August 24, 2025
Homeकोल्हापूरपंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट

पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट

गेल्या ३ ते ४ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडले आहे. सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी ३१ फुटांवर पोहोचली आहे.

 

तर इशारा पातळी गाठायला केवळ ८ फूट बाकी आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील ४६ बंधारे सध्या पाण्याखाली आहेत.

 

पावसाचा जोर वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय राधानगरी धरणाचे एकूण सात स्वयंचलित दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

 

आज रेड, पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. घाट क्षेत्रातील काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

 

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाट क्षेत्रालाही रेड अलर्ट दिला आहे.सिंधुदुर्गमध्येही पावसाचा जोर

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात ८६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कणकवली तालुक्यात सर्वाधिक १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कणकवली तालुक्यातील गड नदी पात्रातील पाणी पातळी वाढली आहे. वैभववाडी येथेही जोरदार पाऊस झाला आहे. पण येथे दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -