Sunday, August 24, 2025
Homeब्रेकिंग‘या’ दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती

‘या’ दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती

आज लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. याच दरम्यान दुपारी 2 वाजता भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (आयएसएस) भेटीवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल अशी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी, ‘संपूर्ण देश शुभांशू यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे. मात्र विरोधी पक्ष गोंधळ घालत आहेत, ते सभागृहात चर्चेसाठी तयार नाहीत. विरोधी पक्ष अंतराळवीरावर कसा नाराज असू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.

 

विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘2047 पर्यंत विकसित भारतासाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका’ या विषयावर विशेष चर्चा सुरू केली. यावेळी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल अशी माहिती दिली. 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचे हे यश असेल.’

 

विरोधकांवर निशाणा साधला

जितेंद्र सिंह यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. ‘देशात उत्सवाचे वातावरण आहे, देश अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा उत्सव साजरा करत आहे, मात्र विरोधक अवकाश क्षेत्रातील तज्ञांचेही अभिनंदन करण्यास तयार नाहीत. विरोधक सरकार आणि भाजप, एनडीएवर नाराज असू शकतात, परंतु ते अंतराळवीरावर, गगनयान प्रवाशावरही नाराज कसे काय असू शकतात? विरोधकांची ही नाराजी स्वतःवरील राग व्यक्त करते कारण ते त्यांच्या सर्व योजनांमध्ये अपयशी ठरले हे यातून सिद्ध होते.

 

जगाने भारताची ताकद मान्य केली

ऑपरेशन सिंदूर दरम्यान अवकाशात भारताच्या ताकदीचे प्रदर्शन पाहून संपूर्ण जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अंतराळ विभागाने महत्वाची भूमिका बजावली. यासाठी गेल्या 10 वर्षात तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते असंही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -