Saturday, August 23, 2025
Homeयोजनानोकरीदहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बीएसएफमध्ये मेगा भरती

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! बीएसएफमध्ये मेगा भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दल कडून 2025 साली तब्बल 3588 पदांसाठी भरती (recruitment)जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ही भरती प्रक्रिया 18 ऑगस्टपासून सुरू झाली असून अर्ज करण्यासाठी केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा, कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे.

 

या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांना पात्रता आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. वयाची अट 18 ते 25 वर्षे अशी ठेवण्यात आली असून, मागास प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.ही भरती (recruitment)प्रक्रिया विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांसाठी मोठी संधी ठरणार आहे. कारण कमी शैक्षणिक पात्रतेवर सरकारी सेवेत प्रवेशाची सुवर्णसंधी बीएसएफकडून मिळत आहे.

 

उमेदवारांची निवड चार टप्प्यांमधून होणार आहे. त्यामध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार केल्यावरच अंतिम नियुक्ती दिली जाणार आहे.भरती होणाऱ्या पदांमध्ये स्वयंपाकी, सुतार, नाई, पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, वॉशरमन, स्वीपर, टेलर, माळी यांसारख्या विविध तांत्रिक व सहाय्यक पदांचा समावेश आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी थेट BSF च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया, अटी आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.म्हणूनच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी ही सुवर्णसंधी दवडू नये आणि तातडीने अर्ज करावा, अन्यथा अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -