Friday, December 12, 2025
Homeयोजनानोकरीतब्बल 1.20 लाखांहून अधिक उमेदवारांना रेल्वेत नोकरी! रेल्वे मंत्र्यांनीच दिली महत्त्वाची माहिती...

तब्बल 1.20 लाखांहून अधिक उमेदवारांना रेल्वेत नोकरी! रेल्वे मंत्र्यांनीच दिली महत्त्वाची माहिती…

देशभरातील लाखो उमेदवार रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. अशा तरुणांसाठी रेल्वेच्या भरतीसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2024 आणि 2025 सालातील एकूण 1 लाख 20 हजार 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

 

हिवाळी अधिवेशनादरम्यान, संसदेत रेल्वे मंत्र्यांनी ही महत्त्वाची माहिती सांगितली.

 

तब्बल 1,20,579 पदांसाठी भरती

 

अनेकांचं रेल्वेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन वर्षांत भरतीची प्रक्रिया जलद करण्यात आली असून यासंबंधी नोटिफिकेशन सुद्धा जाहीर झाले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये रेल्वेने 10 मोठ्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले होते. यामध्ये 91 हजार 116 पदांसाठी भरती केली जात आहे. तसेच, 2025 मध्ये रेल्वेकडून भरतीचे 7 नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून दोन्ही वर्षांत तब्बल 1,20,579 पदांसाठी भरती जाहीर झाली.

 

‘या’ पदांसाठी निघाली भरती…

 

रेल्वेने यावेळी जवळपास प्रत्येक क्षेत्रातील पदांसाठी भरती जाहीर केली असून यामध्ये सहाय्यक लोको पायलट म्हणजेच ALP, टेक्निशिअन, ‘आरपीएफ’मध्ये उप-निरीक्षक आणि कॉन्स्टेबल पद, जूनिअर इंजीनिअर, डिपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिक असिस्टंट, पॅरामेडिकल स्टाफ, NTPC मधील बरीच पदे, मिनिस्टीरिअल आणि आयसोलेटेड कॅटेगरी तसेच लेव्हल-1 च्या ट्रैक मेंटेनर आणि असिस्टंट पदांचा समावेश आहे.

 

यावेळी भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून यामुळे भरतीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुनिश्चित होणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केलं. यामुळे उमेदवारांना भरतीची तयारी करणं देखील सोपं होणार आहे.

 

रेल्वे मंत्र्यांनी संसदेत आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं की, 2004 ते 2014 दरम्यान रेल्वेच्या भरतीअंतर्गत तब्बल 4 लाख उमेदवारांना नोकरी मिळाली. तसेच, 2014 ते 2015 दरम्यान रेल्वेत भरती होणाऱ्या उमेदवारांची संख्या 5 लाख 8 हजार पर्यंत पोहोचली. येणाऱ्या वर्षात सुद्धा, रेल्वेतील रिक्त पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -