Saturday, August 23, 2025
Homeब्रेकिंगTikTok प्रेमींसाठी मोठी अपडेट; टिकटॉक बंदीवरून मोदी सरकारचा यु-टर्न? त्या आदेशाबाबत पहिल्यांदाच...

TikTok प्रेमींसाठी मोठी अपडेट; टिकटॉक बंदीवरून मोदी सरकारचा यु-टर्न? त्या आदेशाबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा

टिकटॉक (TikTok) प्रेमींसाठी मोठी अपडेट समोर येत आहे. सोशल मीडियावर आता चिनी कंपन्यांसाठी रस्ता प्रशस्त होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर मोदी सरकारने मोठा खुलासा केला आहे. चीनसोबत भारताचे संबंध झपाट्याने सुधारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यापूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉक सुरू होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर आता सरकराने खुलासा केला आहे.

 

मोदी सरकारचे धोरण काय?

 

भारत सरकारने चीनचे शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील (TikTok) बंदी हटवली नाही. बंदी हटवण्यासाठी कोणताही आदेश दिला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. वृत्तसंस्था ANI ने सरकारी सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार टिकटॉकवरील बंद हटवण्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही. टिकटॉक, AliExpress आणि Shein या सारखे ॲप अनब्लॉक केल्याची वृत्त समोर येत होती. त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आली आहेत.

 

भारतात केव्हा घातली बंदी

 

टिकटॉक, AliExpress आणि इतर 58 चिनी ॲप्सवर जून 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. डेटा सुरक्षा आणि खासगी माहितीचा अधिकार हे कारण समोर करत प्रतिबंध घालण्यात आले. ही ॲप्स भारताची सुरक्षा, अखंडता, एकता आणि सार्वभौमत्व यांना धोका ठरत असल्याचे सरकारचे म्हणणे होते. भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठा तणाव झाला. त्यानंतर भारताने दोन आठवड्यातच चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर भारतातील 20 कोटींहून ॲक्टिव्ह, सक्रीय युझर्स या प्लॅटफॉर्मपासून विभक्त झाले. तेव्हापासून ही ॲप्स भारतात बंद आहेत.

 

भारत-चीन संबंधांवर लक्ष्य

 

अमेरिकेच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी चीन आणि भारत या आशियातील बड्या शक्ती पुन्हा एकमेकांजवळ आल्या आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी नवी दिल्लीत भेट दिली. या यात्रेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये संबंध पुन्हा सुरू व्हावेत अशी इच्छा वांग यी यांनी व्यक्त केली आहे. या महिन्याच्या अखेरीस शांघाय सहकार्य संस्था (SCO) शिखर संमेलनासाठी पंतप्रधान चीन दौऱ्यावर जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -