लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र ऑगस्टचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता असून, तो सप्टेंबरच्या हप्त्यासह एकत्र मिळू शकतो.
त्यामुळे लाभार्थिनींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खुशखबर मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.