डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असून सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन अमेरिकेकडून भारतावर टीका केली जात आहे. आता परत एकदा मोठी धमकी देण्यात आली आहे. टॅरिफचा मुद्दा तापलेला असतानाच आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबाबत मोठे भाष्य करण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, प्रतिबंध लावून काही होणार नाहीये. मी पुढच्या दोन आठवड्यात याबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान म्हटले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर जेलेंस्की या दोघांनी एकत्र बसून चर्चा करावी. जर यांनी असे केले नाही तर मला बघावे लागेल असे का होत नाही. पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, युक्रेनमधील अमेरिकेच्या एका कारखान्यावर रशियाने हल्ला केला, त्याचा मी निषेध करतो. मी सात युद्ध रोकले आहेत आणि तीन युद्ध टाळली आहेत. पुढच्या दोन आठवड्यात मी मोठा निर्णय घेणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी परत एकदा भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेत परमाणू युद्ध होणार होते, ते मी टाळले आहे. भारताकडून वेळोवेळी सांगण्यात आले की, या युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा काही हस्तक्षेप नव्हता. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठकीमधून निर्णय घेऊन हे युद्ध थांबवले आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आता परत याबद्दल दावा केला आहे.
युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी जाहिर केले की, पुतिन हे जेलेंस्की यांना भेटण्यास तयार आहेत. आता युक्रेन देखील पुतिन यांच्यासोबतच्या भेटीला तयार होते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. जर या दोघांमध्ये भेट झाली नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारतावर सतत गंभीर आरोप हे अमेरिकेकडून केली जात आहेत.