Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रपत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या नैराश्यातून पतीनेही घेतला गळफास, दोन अनाथ मुलांच काय?

पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याच्या नैराश्यातून पतीनेही घेतला गळफास, दोन अनाथ मुलांच काय?

पत्नीच्या विरहासह नैराश्येतून सागर प्रकाश पोवार (वय ३९, रा. सुभाषनगर, मूळ रा. भेंडे गल्ली, शिवाजी चौक) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

 

नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी, सागर पोवार याचे मूळ घर भेंडे गल्लीमध्ये आहे. सुभाषनगरातही त्याचे एक घर असल्याने तो सध्या याच खोलीत राहत होता. २०२० मध्ये त्याच्या पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

या घटनेनंतर तो नैराश्यात गेल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, आज दुपारी त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घरी कोणीच नसल्याने ही घटना उशिरा उघडकीस आली. त्याची दोन्ही मुले सध्या त्याच्या सासरवाडीमध्ये राहण्यास आहेत. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -