Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रपहिल्याच एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट; स्पर्धकांमध्ये अशी लावली फूस

पहिल्याच एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट; स्पर्धकांमध्ये अशी लावली फूस

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेत असलेला शो ‘बिग बॉस’चा 19 वा सिझन सुरू झाला आहे. रविवारी या शोचा प्रीमिअर धमाकेदार पद्धतीने पार पडला. यात 16 स्पर्धकांनी भाग घेतला आणि पुढील पाच महिने ते बिग बॉसच्या घरात राहणार आहेत. या शोची सुरुवात होताच पहिल्या एपिसोडमध्ये मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर त्याचा पहिला प्रोमो पोस्ट करण्यात आला असून नेटकऱ्यांमध्ये सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. घरातील 16 सदस्यांसमोर बिग बॉसने एक विचित्र घोषणा केली. अशा पद्धतीची घोषणा याआधी कधीच झाली नव्हती. बिग बॉसच्या घरात ही घोषणा ऐकताच सर्व सदस्य चकीत होतात. या घोषणेत ज्या सदस्याबद्दल बोललं जातंय, तो आहे तरी कोण, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे.

 

घरात एक असा सदस्य आहे, जो सर्वांत कमी इंटरेस्टिंग आहे, असं बिग बॉसने म्हटलंय. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या प्रोमोमध्ये ऐकायला मिळतंय, ‘या सिझनचा पहिला निर्णय, सदस्य 16 आणि बेड्स 15. घरातला एक सदस्य असा आहे जो बिग बॉसच्या घराचा सदस्य होण्याच्या लायक वाटत नाहीये. कारण त्याची पर्सनॅलिटी सर्वांत कमी इंटरेस्टिंग वाटतेय.’ मजेशीर बाब म्हणजे हा स्पर्धक कोण आहे, याची घोषणा खुद्द बिग बॉससुद्धा करत नाही. त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार घरातल्या स्पर्धकांना दिला जातो.

 

हा प्रोमो पाहून ही गोष्ट स्पष्ट होतेय की बिग बॉसने पहिल्याच एपिसोड आणि पहिल्याच प्रोमोपासून घरातल्या स्पर्धकांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. ही घोषणा ऐकताच घरातील सर्वजण आपापसांत चर्चा करू लागतात. यात कुनिका सदानंद थेट बिग बॉसलाच भिडते. “हिरोगिरी करू नकोस, नाव सांग चल”, असं ती म्हणते. तर बशील अली म्हणतो, “अर्थात आमच्याकडे ते नाव आहे.”

 

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस 19’ या शोचा ग्रँड प्रीमिअर रविवारी 24 ऑगस्ट रोजी पार पडला. या एपिसोडमध्ये सर्व 16 सदस्यांनी घरात एण्ट्री घेतली. यात सर्वांत आधी अशनूर आणि त्यानंतर कुनिका सदानंद, गौरव खन्ना यांसारखे स्पर्धक होते. याशिवाय घरात जीशान कादरी, तान्या मित्तल, नगमा मिराजकर, आवेज दरबार, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, बशीर अली, नतालिया जेनोशेक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक हे सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात तीन सदस्यांची वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार असल्याचीही चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -