बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या तुरुंगात आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचं सांगत दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. पण यालयाने काही निरीक्षणे नोंदवत वाल्मीक कराडला दोष मुक्त का करण्यात येत नाही? सांगितले. वाल्मिक कराडने सध्या तुरुंगात असून त्याने कोर्टाकडे सीपॅप मशीन देण्याची विनंती केली होती. आता हे मशीन बिग बॉस 19च्या घरात पहायाला मिळाल्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. हे नेमकं कसलं मशीन आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
छोट्या पडद्यावरील बिग बॉस 19 हा शो नुकताच सुरु झाला आहे. या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यामधील अमाल मलिकला सीपॅप मशीन वापरताना पाहिले गेले आहे.बिग बॉसच्या घरात दिसत असलेलं हे मशीन जेलमधील वाल्मिक कराडला देण्यात आली होती. स्लीप एपनिया आजार असलेल्या व्यक्तीला ही मशीन लावण्यात येते.
अमाल मलिक आणि वाल्मीक कराड या दोघांनाही स्लीप एपनियाचा त्रास आहे. या गंभीर आजारात झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो.हा आजार असलेल्यांना काही वेळा झोपेत श्वासही घेता येत नाही.
या मशीनच्या माध्यमातून श्वास घेणे सोपे होते. कधीकधी या आजारामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि डोकेदुखी अशी लक्षणे जाणवतात.



