Saturday, September 6, 2025
Homeमहाराष्ट्रसर्व मराठ्यांना ओबीसीत घालणारच, काय करायचे ते…मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

सर्व मराठ्यांना ओबीसीत घालणारच, काय करायचे ते…मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. मात्र, यादरम्यान मुंबईमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली. हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले होते. सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज हा आक्रमक होताना दिसत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवत आपली नाराजी जाहीर केली. यानंतर सरकारकडून ओसीबी आरक्षण संदर्भात देखील मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली. नागपूरमध्ये ओबीसी बांधवांकडून उपोषण केले जात आहे. या उपोषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार आहेत.

 

आता नुकताच मनोज जरांगे पाटील यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. जरांगे यांनी म्हटले की, कोणी कितीही काहीही केले तरीही मी माझ्या गरिबांना आरक्षण देणार आणि हे माझ्या गरिब मराठ्यांना पटलेले आहे आणि ओबीसींमध्ये मराठ्यांना मीच घालणार…ओबीसींसाठी उपसमिती तयार केली चांगले आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी मी सक्षम आहे. कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आम्हाला आरक्षण मिळणारच.

 

भुजबळांबद्दल बोलताना जरांगे यांनी म्हटले की, भुजबळ हे पक्ष संपवणारा आणि कार्यकर्त्यांन संपवणारा माणूस आहे. जे आता जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत, ते अगोदर कुठे झोपले होते, बैठकांना बोलावल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत. मराठा समाजात संभ्रम निर्माण होत नाही आणि होणारही नाही. मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी लढतो, झगडतोय तितकं कोणीही करणार नाही.

 

मी मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात हे मराठ्यांना दिसणार. यामुळे मराठ्यांनी संभ्रम करून घेऊ नका. सातारा गॅझेटबद्दलही सरकारने हायगाई करता कामा नये, जर हे झाले नाही तर मी पुन्हा तुमचे रस्त्यावर फिरणे बंद करेल. फक्त संभ्रम ठेऊ नका, चुकले काही तर मी आहे ना? असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी परत एकदा सरकारला अत्यंत मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -