Saturday, January 17, 2026
Homeयोजनाशेतकऱ्यांचं चांगभलं, नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट; खात्यात पैसे आलेत का?

शेतकऱ्यांचं चांगभलं, नमो शेतकरी योजनेबाबत मोठी अपडेट; खात्यात पैसे आलेत का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरु केली. राज्य सरकारने नमो महायोजना सुरु केली. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळतील.राज्य सरकार तीन हफ्त्यामध्ये पैसे जमा करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 वा हफ्ता दिला. तर आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हफ्ता देण्यात आला.

 

महायुती सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केलेय. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. महासन्मान निधीचे पैसे आज आम्ही जमा केलेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हफ्ता आज वितरित झाला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

राज्यातील जवळपास 91 लाख 65 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली.नमो शेतकरी महासन्मान योजनेतंर्गत 1892 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -