खोतवाडी-तास्दाज परिसरातील एका खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्नुधावर छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एकूण २ लाख १७ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यात रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व मोटारसायकलचा समावेश आहे.
माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तारदाळ नाका ते तारदाळकडे जाणाऱ्या सल्यावर रामदेव किराणा स्टोअर्सच्या बाजूस आकाश मलके यांच्यात पोलिसांनी माहितीच्या आधारे छापा टाकला. यावेळी संशयित आकाश राजेश बालके (रा. खोतमवा तारदाळ), विनायक शिवाजी तोडकर (रा. जयभीमनगर, इचलकरंजी), सालिम सिकंदर मुलनानी (रा. भारत माता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी), काशिम शिरार आब (रा. दत्तनगर, शहापूर), हुसेन लतिफ शेख (रा. पाण्याची टाकी, शहापूर), करण शाम मछले (रा. गौरीशंकर नगर, तारदाळ), अविनाश मनोहर कुला (रा. सांगली रोड, इचलकरंजी), सैफान सलीम शेख (रा. लक्ष्मीनगर, तारदा) रमजान मुर्तजा मुल्ला (रा. आझादनगर, तारदाळ) हे तीनपानी जुगार खेळताना मिळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १४ हजार १५० रोख रक्कम ४३ हजार रूपये किंमतीचे सात मोबाईल आणि १ लाख ६० हजार रूपये किमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण २ लाख १७ हजार १५० स्पषांचा मुद्देमाल जाम केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय शामराव मगदूम यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, खोतवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डे सुरू असत्याची चर्चा सुरू होती. या छाप्यामुळे








