Saturday, October 18, 2025
Homeजरा हटकेतिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची 'लसूण शेव' घरी कशी तयार करायची? पारंपरिक...

तिखट, झणझणीत आणि कुरकुरीत चवीची ‘लसूण शेव’ घरी कशी तयार करायची? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

“भारतीय स्नॅक्स म्हटले की शेव हा एक अविभाज्य भाग आहे. चहाच्या कपाबरोबर, भेळपुरीमध्ये किंवा नुसता खायलाही शेव एकदम मस्त लागतो. पण आज आपण बनवणार आहोत थोडी वेगळी आणि चवदार शेव बनवणार आहोत ज्याचं नाव आहे लसूण शेव!

 

या शेवमध्ये लसूणाचा झणझणीत आणि सुगंधी स्वाद असतो, जो एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. बाजारात मिळणाऱ्या शेवपेक्षा घरची लसूण शेव अधिक ताजी, कुरकुरीत आणि स्वच्छ बनते.

 

ही शेव तुम्ही दुपारच्या जेवणात भाजीसोबत, संध्याकाळच्या चहात किंवा दिवाळीच्या फराळातही सहज सर्व्ह करू शकता. दिवाळीचा सण जवळ आला आहे अशात फराळाच्या पदार्थांमध्येही तुम्ही याचा समावेश करु शकता. संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भूकेला शमवण्यासाठी आणि टी टाईम स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

 

साहित्य

 

बेसन (हरभऱ्याचे पीठ) – 2 कप

लसूण पाकळ्या – 10 ते 12

हिरव्या मिरच्या – 2

लाल तिखट – 1 टीस्पून

हळद – ¼ टीस्पून

ओवा- ¼ टीस्पून (ऐच्छिक)

मीठ – चवीनुसार

तेल – 2 टेबलस्पून (मिश्रणात घालण्यासाठी)

पाणी – आवश्यकतेनुसार

तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार

 

कृती

 

यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून बारीक पेस्ट बनवा.

एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या. त्यात हळद, लाल तिखट, अजवाइन आणि मीठ घाला. मग तयार लसूण-मिरची पेस्ट त्यात टाका.

त्यात 2 टेबलस्पून गरम तेल (मोहनासाठी) घाला आणि चांगले मिसळा. त्यामुळे शेव अधिक कुरकुरीत होते.

हळूहळू पाणी घालत मऊ पण घट्टसर गोळा मळा.

शेव बनवण्यासाठी शेव साच्यात गोळा भरा. हा साचा तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल.

गरम तेलात शेव प्रेस करून सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळा. मध्यम आचेवरच तळल्यास शेव योग्यपणे खुसखुशीत होते.

तळलेली शेव पेपरवर काढा आणि पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरा.

शेव जास्त पातळ हवी असल्यास बारीक साचा वापरा.

लसणाचा स्वाद वाढवायचा असल्यास थोडं जास्त लसूण वापरू शकता.

शेव तळताना तेल पुरेसे गरम असणे आवश्यक आहे, नाहीतर शेव मऊ राहते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -