Friday, October 17, 2025
Homeमहाराष्ट्रकरगणीतील दुचाकीस्वाराचा कागलजवळ नदीत पडून मृत्यू

करगणीतील दुचाकीस्वाराचा कागलजवळ नदीत पडून मृत्यू

दूधगंगा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा नदी पात्रातील दगडावर आदळून जागीच मृत्यू झाला. दादा ज्ञानू पाटील (वय 37, रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामाचे दर्शन घेऊन परतताना सिध्दनेर्ली येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झला.

 

दादा पाटील शेती व्यवसाय करीत होते. ते दुचाकीने (एमएच 10 2803) एकटेच आदमापूर येथे बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन आटोपून रात्री उशिरा गावाकडे परतत असताना दूधगंगा पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी पुलाच्या लोखंडी अँगलला जाऊन अडकली. त्या क्षणी ते दुचाकीवरून उडाले आणि खाली नदी पात्रातील दगडावर आदळले. यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने पलायन केले. कागल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी ग््राामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -