मॉन्सूननंतर राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसतोय. ‘मोंथा’ चक्रीवादळाचे मोठे संकट राज्यावर बघायला मिळाले. या चक्रीवादळामध्ये मुसळधार पावसासोबतच जोरदार वारे होते. रत्नागिरी, मुंबई, रायगड या भागात या चक्रीवादळाचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला. आता मोंथा चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे, आज बुधवारी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आणि मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान या वादळाचा प्रभाग बघायला मिळतोय. या चक्रीवादळाने देशभराच धुमाकून घातला. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढील सहा तासांत वादळ कमकुवत होऊन चक्रीवादळात रूपांतरित होईल. 100 किलो प्रतितासाच्या वेगाने हे वादळ धडकले. एक जणाचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळतंय.
भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, धोकादायक चक्रीवादळ मोंथा आता चक्रीवादळात कमकुवत झाले आहे. मात्र, त्याचा धोका अजूनही कायम आहे. आंध्र प्रदेशच्या किनारी भागात सक्रिय आहे. महाराष्ट्रामध्येही या वादळाचा परिणाम बघायला मिळाला. गेल्या सहा तासांत हे वादळ ताशी सुमारे 10 किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकले आणि नरसापूरपासून सुमारे 20 किलोमीटर पश्चिम-वायव्येकडे आहे.
हे चक्रीवादळ धडकल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस, वारे आणि विजांचा कडकडाट बघायला मिळतोय. प्रशासनाकडून अगोदरच उपायोजना करण्यात आल्या. हवामान खात्याने सांगितले होते की, या चक्रीवादळाची पुढील सहा तासांपर्यंत सध्याची तीव्रता कायम राहील, त्यानंतर त्याचे रूपांतर खोल दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. सध्या मिळालेल्या अपडेटनुसार, सध्याही या चक्रीवादळाचा परिणाम बघायला मिळत आहे.
आता या चक्रीवादळाची तीव्रता कमी झालीये. मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. विदर्भासह मराठवाड्यात काही भागात आज ढगाळ वातावरणासोबतच पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे. मुंबईमध्येही काल दिवसभर ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची हजेरी बघायला मिळतंय. मॉन्सून जाऊनही पाऊस सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पूर्ण पिके वाहून गेली राज्यातील शेतकरी राजा चिंतेत आहे.





