Thursday, October 30, 2025
Homeयोजनागरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू, जाणून...

गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

देशातील नागरिकांचे स्वतः चे हक्काचे घर असावे म्हणून सरकारने योजना राबवली आहे. केंद्र सरकारने पीएम आवास योजना सुरु केली आहे. या योजनेत ग्रामीण भागातील नागरिकांना स्वतः चे हक्काचे घर दिले जाते. या योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये स्वतः चे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १.२० लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते

पीएम आवास योजना ही आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्ग (EWS), कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना मदत केली जाते. आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील नागरिकांनी स्वतः चे घर तयार करावे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी अर्ज कसा करावा ते जाणून घ्या.

 

पीएम आवास योजनेसाठी अर्ज करण्याची प्रोसेस (PM Awas Yojana Online Application Process)

 

पीएम आवास योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला pmaymis.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे. सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि संपत्तीची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यानंतर तुम्ही माहिती भरायची आहे. ही ऑनलाइन प्रोसेस खूप सोपी आहे. तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील अर्ज करु शकतात. तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.

 

कागदपत्रे

 

या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सरकारी अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करतात. या योजनेत अर्ज करताना तुम्हाला उत्पन्नाची माहिती द्यायची आहे.या योजनेत तुम्हाला सब्सिडीसोबतच कमीत कमी व्याजदरावर लोनदेखील मिळू शकते. यामुळे तुम्हालाच फायदा होईल.

 

फायदे

 

पीएम आवास योजना ही ग्रामीण भागासाठी राबवण्यात आली आहे. याअंतर्गत अंगीकार २०२५ हे अभियान सुरु केले आहे. यामध्ये तुमचे घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन केले जाईल. यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांचे स्वतः च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -