Wednesday, November 12, 2025
Homeयोजनानोकरीस्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Bombay High Court तर्फे स्टेनोग्राफर (High Grade) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा. मुंबईतील तरुण जर भरती होण्यास इच्छुक आहेत तर नक्कीच या भरतीचा लाभ त्यांनी घेणे आवश्यक आहे. पण तत्पूर्वी ही बातमी वाचा.

 

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असावी. मात्र, जर उमेदवार हायकोर्ट, इतर न्यायालय, न्यायाधिकरण किंवा महाधिवक्ता/सरकारी वकिलांच्या कार्यालयात किमान 5 वर्षे स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत असतील, तर त्यांना या अटीत सवलत मिळू शकते. तसेच, कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.

 

टायपिंग आणि शॉर्टहँड पात्रता पाहिली तर शॉर्टहँड स्पीड प्रति मिनिट 100 शब्द निश्चित करण्यात आली आहे. इंग्रजी टायपिंग स्पीड प्रति मिनिट 40 शब्द निश्चित करण्यात आली आहे.

 

अशा प्रकारे करता येईल अर्ज:

 

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जा.

“Recruitment” विभागात जाऊन Stenographer Recruitment लिंकवर क्लिक करा.

“Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.

तुमचे नाव, वडिलांचे नाव, कॅटेगरी, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती अचूक भरा.

पासपोर्ट साइज फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे 40KBच्या आत अपलोड करा.

अर्जातील सर्व माहिती पुन्हा तपासा आणि काही चुका असल्यास सुधारणा करा.

त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

शेवटी फॉर्मचा प्रिंट आउट काढून सुरक्षित ठेवा.

 

अधिक माहितीसाठी आणि भरतीसंबंधी सर्व अद्यतनांसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्यावी. शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -