पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी जमा होणार, याची शेतकरी आतुरतेने वाट पाहात आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
मात्र आता शेतकऱ्यांना या दोन हजार रुपयांसाठ आणखी थोडा वेळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. आता सरकारने स्पष्ट केल्यानुसार ई-केवायसी आणि फार्मर आयडी असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधीचे 2 हजार रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे या दोन गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्यात असे आवाहन केले जात आहे.
शेतकरी सन्मान निदी योजनेच्या हफ्त्याची घोषणा नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केली आहे. यावेळी मात्र हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या चार राज्यांसाठीच्या 21 व्या हप्त्याची घोषणा कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली होती.
उर्वरित राज्यांसाठी 21 व्या हप्त्याची घोषणा मोदी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम चालू आहे. सध्या आचारसंहिता चालू आहे. या काळात कोणत्याही आकर्षक योजनांची घोषणा करता येत नाही.
त्यामुळे 8 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या 21 व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 8 नोव्हेंबरनंतरच पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.



