समाज प्रभोधनकार आणि प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला, संगमनेरमध्ये मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. मात्र इंदुरीकर महाराज हे आपल्या प्रत्येक किर्तनामध्ये सांगतात की लग्नासारख्या कार्यक्रमामध्ये फार खर्च करू नका, कर्जबाजारी होऊ नका, मात्र त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात प्रचंड खर्च केल्यानं सध्या त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र आपण मुलीच्या साखरपुड्यावर एवढा खर्च का केला? याचं उत्तर देखील त्यांनी दिलं आहे.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा नुकताच साखरपुडा पार पडला, या साखरपुड्यात प्रचंड खर्च करण्यात आल्यानं हा साखरपुडा चांगलाच चर्चेमध्ये आला आहे, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे, मात्र जरी इंदुरीकर महाराज यांनी या साखरपुड्यात मोठा खर्च केला असला तरी देखील त्यांनी एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यानिमित्त शेतकऱ्यांना 1 लाख 11 हजार रुपयांची मदत केली आहे, त्यामुळे एकीकडे महाराजांवर टीका होत असतानाच आता दुसरीकडे त्यांचं कौतुक देखील होत आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा पार पडला, मोठा थाटा-माटात हा सोहळा संपन्न झाला, या साखर पुड्यावर महाराजांनी पैशांची उधळपट्टी केली अशी टीका आता होत आहे, याला महाराजांनीच उत्तर दिलं आहे. सत्कार करायचा तर सगळ्यांचाच करायचा, आपल्याकडे लग्नात पद्धत आहे, काही विशिष्ट जणांचा सत्कार करायचा आणि काही जणांनी तो पहायला त्यामुळे मी या कार्यक्रमामध्ये थोडा बदल केला आहे, लोक मला नाव ठेवतील पण ठेवूद्या, आपण यावेळी कोणाचाच सत्कार केला नाही, त्याऐवजी इथे उपस्थित प्रत्येकाला आपण पांडूरंगाची मूर्ती दिली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा खर्च का केला तर तो तुम्हाला दाखवण्यासाठी केला असा मिष्किल टोलाही यावेळी इंदुरीकर महाराजांनी लगावला आहे.



