मोबाईल वापरणे महाग होणार आहे. कारण आता एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया सारख्या मोठ्या कंपन्या ग्राहकांना महागाईत झटका देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या रिचार्ज आणि डेटा प्लान्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे मोबाईल युजर्सच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.
तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या त्यांच्या रिचार्ज प्लानची किंमत वाढवण्याची तयारी करत आहेत. असा अंदाज लावला जात आहे की हा बदल डिसेंबर २०२५ पासून लागू होऊ शकतो. ज्याचा परिणाम प्रीपेड आणि डेटा वाल्या प्लान्सवर सर्वाधिक होऊ शकतो. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार टेलिकॉम कंपन्यांसाठी हे आवश्यक आहे की मोठे कर्ज फेडण्यासाठी प्रति युजर २०० रुपयांहून अधिक कमाई केली जावी, जी सध्या सरासरी १८० ते १९५ रुपयांच्या दरम्यान आहे.
असा अंदाज लावला जात आहे की १९९ रुपयांचा प्लान २२२ रुपये, तसेच २९९ रुपयांचा २८ दिवस (2GB/दिवस ) वाला प्लान, ३३०-३४५ रुपयांचा ८४ दिवसांचा 2GB/दिवसाचा प्लान ९४९ रुपये ते ९९९ रुपयांपर्यंत महाग होऊ शकतो. या दरवाढीमुळे ग्राहकांना दीर्घकाळाचा प्लान्स वापरताना अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे.
स्वस्तातील प्लान बंद करणार
एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्यांनी सांगितले की टेलिकॉम कंपन्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्याची तयारी सुरु केली आहे. 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी मोठी गुंतवणूक या कंपन्यांकडून सुरु आहे. त्यामुळे या कंपन्यांनी थेट दरवाढ न करता स्वस्तातील प्लानना हळहळू सेवेतून बंद करण्यास सुरु केले आहे.
रिचार्ज प्लान वाढण्याची शक्यता
डिसेंबर २०२५ ते जून २०२६ दरम्यान मोबाईल रिचार्जचे प्लान वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिओ कंपनी त्यांचा आयपीओ येण्यापूर्वीच १५ टक्के दरवाढ लागू करु शकते. तर इतर कंपन्या १० टक्के दरवाढ लागू करु शकतात.
यूजर्सना एकमेव संधी ?
जर तुम्हाला महागाईपासून वाचायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला आहे की नोव्हेंबर २०२५ मध्ये दीर्घकालीन व्हॅलिटीडीचा प्लान रिचार्ज करावा, यामुळे तुम्हाला सध्याच्या दरात पुढील अनेक महिन्यांची सेवा मिळू शकते. जर तुम्ही दीर्घकालिन डेटाचा वापर करत असाल तर वार्षिक, वा त्याहून दीर्घ वैधतेचा प्लान रिचार्ज करणे फायद्याचे होऊ शकते. BSNL सध्या या दरवाढी पासून लांब आहे.



