कबनूर परिसरात बंद पानपट्टीच्या आडोशाला मटका घेत असताना एकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. गजानन पांडुरंग देव (वय ५६ रा. वागडी गामनी कवनूर) असे त्याचे नांध आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार मनोहर यशवंत राऊत यांनी फिर्याद दिली आहे.
गुरुवारी दुपारच्या सुमारास कबनूर ते फॅक्टरी रोडवरील भवानी कॉर्नर येथे बंद पानपट्टीच्या आडोशाला गजानन देव हा कल्याण मटका घेत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून ७३० रुपयांची रोकड जाम करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.



