ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्याने पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी संताप व्यक्त केला. ईशा देओन हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. हेमा मालिनी देखील संतापल्या. जे काही घडतंय ते अक्षम्य आहे, असे म्हणत त्यांनी समाचार घेतला. धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले. कालपासून धर्मेंद्र यांना बघण्यासाठी बॉलिवूड कलाकार जात आहेत. त्यामध्येच सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली. मात्र, त्यांच्या निधनाची बातमी फक्त आणि फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले. 89 वर्षाचे धर्मेंद्र असून त्यांची तब्येत नाजूक असल्याचे सांगितले जाते.
वडिलांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर स्वत: ईशा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि अफवा असल्याचे सांगितले. यानंतर ईशा देओल हिने थेट ब्रीच कँडी हॉस्पिटल गाठले. ईशा देओल निधनाच्या अफवांनंतर हॉस्पिटलमध्ये जाताना स्पॉट झाली. ईशा देओल धर्मेंद्र यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर सतत त्यांच्यासोबत आहे. हेमा मालिनी या देखील रूग्णालयात असल्याची माहिती मिळतंय.
धर्मेंद्र यांची तब्येत अत्यंत नाजूक असल्याची चर्चा आहे. हेमा मालिनी यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते की, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असून सुधारणा होत आहे. काल बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेला होता. त्यासोबतच अनेक कलाकारही पोहोचले होते. सनी देओल देखील वडिलांना बघण्यासाठी कुटुंबियांसोबत पोहोचला होता.
मागील काही दिवसांपासून सतत धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विविध चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्येच पहाटे त्यांच्या निधनाची बातमी पसरली. धर्मेंद्र यांनी अत्यंत मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. त्यांच्या चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. पहिली पत्नी प्रकाश काैर यांना घटस्फोट न देताच धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केले. प्रकाश काैर यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत तर हेमा मालिनी यांना दोन मुली आहेत.



