राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. भारतीय हवामानाच्या अंदाजानुसार, 20 नोव्हेंबर रोजी राज्यात तापमानात घट कायम राहणार असून बहुतांश भागांत कोरडे आणि निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडे थंडी वाढत असून पारा सातत्याने घसरत आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह येत असल्याने गारठा कामय आहे. शिवाय सकाळी गार वाऱ्यासह गारठा जाणवतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका अजून वाढेल. महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट जारी करण्यात आला. काही भागात थंडी वाढत असतानाच देशाच्या तीन राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील वातावरणात बदल झाला आणि थंडी सुरू झाली. त्यापूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पाऊस कोसळत होता.
धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.1 अंश सेल्सयस नोंदवला गेला. दिवसागणित तापमान खाली येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तापमानाचा पारस 6.1°c नोंदवला गेले. शाळेचे वेळ बदलण्याची मागणी पालकांनी केली आहे. शीतलहरीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. येणारे काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. धुळ्यासह पुण्यातही थंडीचा कडाका वाढला असल्याचे चित्र आहे.
आज मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं असू शकते. मुंबई सह उपनगरांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात किमान तापमानात 3 ते 9 अंशांची मोठी घट होण्याची शक्यता आहे. परभणी, निफाडमध्ये 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आहिल्यानगर, पुणे, जळगाव, नाशिक आणि मालेगाव येथे 10 अंशांच्या खाली पारा असल्याने थंडी जास्त जाणवत आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर या भागात पुढील काही दिवसांमध्ये पारा अधिक घसरण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडे थंडी वाढली की, महाराष्ट्र देखील थंडी वाढते. महाराष्ट्रात हिम लाट येणार असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढलेल्या गारठ्यामुळे सकाळच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झालंय.




