Monday, November 24, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : नदाफ टोळीतील पाच जणांना पोलीस कोठडी

इचलकरंजी : नदाफ टोळीतील पाच जणांना पोलीस कोठडी

मोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या सलमान नदाफ टोळीतील पाच जणांना अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता २६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

गावभाग परिसरातील ब्युटी पार्लरमध्ये घुसून तोडफोड व मारहाण केल्याप्रकरणी सलमान नदाफसह त्याच्या टोळीतील सदस्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. दरम्यान सलमान नदाफ टोळीतील सदस्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये टोळीप्रमुख सलमान राजू नदाफ (वय २५ रा. परीट गल्ली), अविनाश विजय पडियार (वय १९ रा. खंडोबावाडी पड़ियार वसाहत यड्राव), आरसलान यासीन सय्यद (वय १९ रा. कलावती मंदिर शेजारी), यश संदीप भिसे (वय १९ रा. गल्ली नंबर पाच शहापूर) व अनिकेत विजय पोवार (वय २२ रा. दतवाड) या पाच जणांना मोका अंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.

 

सरकारतर्फे अॅड. हेमंत मोहिते पाटील तर संशयित आरोपीच्या वतीने अॅड. डी. एम. लटके यांनी बाजू मांडली, न्यायालयाने सदर पाच संशयितांना २६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -