Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रड्रायव्हरला हार्टअटॅक, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात

ड्रायव्हरला हार्टअटॅक, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारचा भीषण अपघात

अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या अनेक दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही गाडी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांची होती. महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेत किरण चौबे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. बुवापाडा परिसरात संघटनेच्या सभेसाठी जात असताना किरण चौबे यांच्या कारचा अपघात झाला.

 

किरण चौबे यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याला अचानक हार्टअटॅक आला. त्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी माहिती चौबे यांच्या नातेवाईकांनी दिली. अपघातात ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. किरण चौबे यांना सुद्धा या अपघातात मार लागला आहे. त्यांना तातडीने कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

किरण चौबे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये संपूर्ण घटनेचा थरार कैद झाला आहे.

 

किती वाजता झाला अपघात?

 

या अपघात प्रकरणात अंबरनाथ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुलावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी किरण चौबे यांची अपघातग्रस्त कार पोलीस स्थानकात हलवली. काल सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या कारने बाईक स्वार व काही पादचारी नागरिकांना चिरडलं. या प्रकरणी पोलिसांनी रात्रभर अनेक जणांचे जबाब नोंदवले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील लोक लांब फेकले गेले. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताच्यावेळी कार प्रचंड वेगात होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -