Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रइचलकरंजीतील सहा प्रभागात महिला मतदार अधिक, इच्छुकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

इचलकरंजीतील सहा प्रभागात महिला मतदार अधिक, इच्छुकांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये १६ पैकी तब्बल सहा प्रभागांत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेने जास्त आहे.

 

त्यामुळे या प्रभागांमध्ये महिला मतदारांचा विशेष प्रभाव दिसून येणार आहे. या निवडणुकीसाठी तब्बल दोन लाख ४९ हजार १२९ मतदारांची नोंदणी झाली आहे. शहरातील सर्वात कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग चार ठरला आहे.

 

तेथे १२ हजार १७१ मतदार आहेत. तर पाच सदस्यीय प्रभाग असलेल्या क्रमांक १६ मध्ये तब्बल २२ हजार ९८ मतदार आहेत. प्रारुप मतदारयादीवर हरकत दाखल करण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दरम्यान, यादी पाहण्यासाठीप्रारुप मतदार याद्या कार्यक्रम दोन वेळा पुढे ढकलला होता. सुधारित कार्यक्रमानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आज प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली.

 

एकूण मतदारांमध्ये एक लाख २५ हजार ७८७ पुरुष, तर एक लाख २३ हजार २८७ महिला आहेत. इतर मतदारांची संख्या ५५ आहे. विशेष म्हणजे प्रभाग ७, ८, ९, १०, १३ व १६ प्रभागामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. तृतीय पंथीय मतदारांची एकूण सहा प्रभागात नोंद आहे. त्यामध्ये प्रभाग १३ मध्ये ५५ पैकी तब्बल ४३ तृतीय पंथीय मतदारांची नोंद झाली आहे.

 

प्रभाग क्रमांक * पुरुष * स्त्री * इतर * एकूण मतदार

 

१* ६५०३ * ६०७८ * ० * १२५८१, २ * ६७२४ * ६३६५ * ० * १३०८९, ३ * ७०५५ * ६९२९ * ० * १३९८४, ४ * ६२२० * ५९५१ * ० * १२१७१, ५ * ७८७० * ७७२९ * * ० * १५५९९, ६ * ८९९८ * ८५२० * ५ * १७५२३, ७ * ८३४० * ८४८४ * ३ * १६८२७,

 

८ * ८२२१ * ८२८४ * १ * १६५०६, ९ * ७८७२ * ८२७७ * ० * १६१४९, १० * ७५६३ * ७६८९ * २ * १५२५४, ११ * ७२९६ * ७०६० * ० * १४३५६, १२ * ७९३३ * ७५१२ * ० * १५४४५, १३ * ८१३० * ८१४१ * ४३ * १६३१४, १४ * ७८०३ * ७३९९ * ० * १५२०२, १५ * ८३२० * ७७११ * ० * १६०३१, १६ * १०९३९ * १११५८ * १ * २२०९८

 

एकूण * १२५७८७ * १२३२८७ * ५५ * २४९१२९

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -