‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ची ट्रॉफी आपल्या नावावर करणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच सुरजचं घर बांधून तयार झालं. त्याने आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
त्याचं आलिशान घर पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसतायत. आता सुरज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे चाहते त्याच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र त्यापूर्वी सूरजच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरजने होणाऱ्या पत्नीसोबत प्री- वेडिंग शूट केलंय.
सुरज येत्या २९ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. सासवड-जेजुरी या ठिकाणी 29 नोव्हेंबरला सूरजचा विवाहसोहळा पार पडणार आहे. सूरज चव्हाणच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी ‘झापूक झूपूक’ सूरज चव्हाणच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पुण्यातील पिक्सेल सिटीच्या सेटवर त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. सूरजचा नेहमीपेक्षा हटके लूक खूपच कमाल दिसतोय.
सूरज आणि संजना गोफणे यांनी वेस्टर्न आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे. व्हाईट टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा सूट-बूट असा लुक सूरजने केला आहे. तर संजनाने लाल रंगाचा पार्टीवेअर गाऊन परिधान केला आहे. सूरज आणि संजनाचा डेनिम लूकदेखील लक्ष खास ठरलाय. कारण या फोटोमध्ये सूरज संजनाला गुलाबाची फुलं देताना दिसत आहे. सूरजने खास पारंपारिक पेहरावातही फोटोशूट केलं आहे. संजनाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. तर सूरज भाऊने पांढऱ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट परिधान केला आहे.
सूरज 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी आता कोणकोणते सेलेब्रिटी येणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे



