इचलकरंजी /प्रतिनिधी –
प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी अरुण काशीद (लोकमत) तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे (सकाळ) यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.
प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जुनी नगरपालिका येथील पत्रकार कक्षात संपन्न झाली. याप्रसंगी या निवडी करण्यात आल्या. यामध्ये संघटनेच्या सेक्रेटरीपदी संदीप जगताप (सकाळ) त्याचबरोबर खजिनदारपदी सुनील मनोळे (महासत्ता) यांची निवड करण्यात आली. यावेळी ६ जानेवारी २०२६ पत्रकार दिन साजरा करणे त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करणे या विषयावर चर्चा करण्यात आली. नूतन पदाधिकारी यांनी भविष्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, पत्रकारांसाठी विविध योजना आणि वर्षभर वेगवेगळे उपक्रम प्रेस क्लब च्या माध्यमातून राबवणार असल्याचेही सांगितले.
बैठकीस दयानंद लिपारे (लोकसत्ता), संजय खुळ (तरुण भारत), शरद सुखटणकर (पुढारी), अजय काकडे (महासत्ता), ऋषिकेश राऊत (सकाळ) उपस्थित होते.



