Friday, December 12, 2025
Homeइचलकरंजीबाबासाहेब अध्यक्ष तर सुभाष उपाध्यक्ष : 'श्रमिक' च्या निवडी जाहीर 

बाबासाहेब अध्यक्ष तर सुभाष उपाध्यक्ष : ‘श्रमिक’ च्या निवडी जाहीर 

इचलकरंजी /प्रतिनिधी –

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची बैठक पत्रकार कक्षात पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष अतुल आंबी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी श्री. आंबी यांनी नुतन कार्यकारीणीची घोषणा केली. त्यामध्ये सचिवपदी रामचंद्र ठिकणे (सामना) व खजिनदारपदी हुसेन कलावंत-शेख (जागृत लोकनेता) यांची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीस अनिल दंडगे, पंडीत कोंडेकर, अतुल आंबी, शितल पाटील, बसवराज कोटगी, डॉ. पांडुरंग पिळणकर, महेश आंबेकर, इराप्णा सिंहासने, शिवानंद रावळ, विजय चव्हाण, भाऊसाहेब फास्के, छोटूसिंग रजपूत, संभाजी गुरव, महावीर चिंचणे उपस्थित होते. निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -