Tuesday, January 13, 2026
Homeअध्यात्ममहिलांनी आपल्या मुलांसाठी करावे हे व्रत मुलांची प्रगती होईल, आरोग्य चांगले राहील...

महिलांनी आपल्या मुलांसाठी करावे हे व्रत मुलांची प्रगती होईल, आरोग्य चांगले राहील : श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो

मित्र- मैत्रिणींनो महिलांनी त्यांच्या मुलांसाठी करावी हे एक व्रत हे व्रत खूप चमत्कारी आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे व्रत आहे. हे व्रत तुमच्या मुलांसाठी खूप लाभदायक आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहील त्यांची प्रगती होईल.

हे व्रत केले तर तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यांचे आरोग्य चांगले राहील त्यांच्यावर कोणते संकट येणार नाही त्यांचं अभ्यासात लक्ष लागेल. मुलांची प्रगती होत राहील. मुले बाहेरच्या देशात abroad city वगैरे शिक्षण घेणार असतील तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज loan काढत असाल तर ते काम पूर्ण होईल. मुले नोकरीसाठी प्रयत्न job Apply करत असतील तर तेही मार्गी लागतील.

परंतु हे व्रत महिलांनीच त्यांच्या मुलांसाठी करायचे आहे स्त्री ही घराची लक्ष्मी असते त्यामुळे तिने केलेल्या कोणत्याही वेळी कोणताही उपवास कोणतेही काम घरासाठी आणि घरातील व्यक्तींसाठी लाभदायकच असते.

हे व्रत मुलांसाठीची आहे त्यामुळे महिलांनी हे व्रत केले तर ते मुलांसाठी लाभदायकच ठरते आणि मुलांना याचा फायदा देखील होतो. चला तर जाणून घेऊया कोणते आहे ते व्रत.

दर महिन्याला एकादशी येते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा एक दिवस सोडून प्रदोष येतो.  प्रदोषाचे व्रत  फक्त महिलांनी करायचे आहे.

हे व्रत अगदी साधे सरळ आहे. इतर उपवास सारखेच दिवसभर उपवास करायचा आणि रात्री उपवास सोडायचा आहे.

दिवसभर तुम्ही फळे खाऊ शकता. दूध पिऊ शकता. चहा कॉफी पिऊ शकता. पण दिवसभर तिखट किंवा मीठ घातलेले कोणतेही पदार्थ होऊ नयेत.

संध्याकाळी म्हणजेच रात्री उपवास सोडावा. उपवास सोडण्यापूर्वी देवांना आणि श्रीस्वामी समर्थांना नैवेद्य दाखवावा.

नैवेद्य दाखवल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. किमान 11 वेळा स्वामींच्या नामाचा जप करावा. वेळ असेल तर तुम्ही एक माळही करू शकता.

जप करून झाल्यानंतर देवाला आणि स्वामींना तुम्ही प्रार्थना करा की हे देवा हे परमेश्वरा माझ्या मुलाबाळांना सुखी कर.

त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संकटे दूर होऊ देत. त्यांची प्रगती होऊ देत. त्यांचे आरोग्य चांगले राहू देत. त्यांना दीर्घायुष्य लाभु देत.

प्रार्थना झाल्यानंतर तेच नैवेद्याचे ताट घेऊन तुम्ही उपवास सोडावा. उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान संध्या नित्यकर्मे आटपून देवाची पूजा करावी

आणि देवाच्या नावचा जप करून उपवासाला सुरुवात करावी. दिवसभर फक्त फळे दूध चहा कॉफी घ्या आणि रात्री उपवास सोडा.

हे व्रत तुम्ही प्रत्येक प्रदोषला करा. कॅलेंडरमध्ये बघून तुम्ही प्रदोषाचा दिवस बघून उपवास करा. तुमच्या मुलाबाळांना याचा लाभ होईल.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -