लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(sisters)लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लाडकी बहीण योजनेत महापालिका निवडणूकीआधी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा केला आहे. त्याआधी मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी महिलांना नोव्हेंबरचा हप्ता दिला होता. त्यामुळे आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.(sisters)५ फेब्रुवारीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जानेवारीतच महिलांना ३००० रुपये येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने याविरोधात निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. याबाबत अग्निम पैसे देऊ शकत नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. त्यानंतर एकच हप्ता दिला होता. आता पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल.
लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये. (sisters)लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले होते. केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नव्हते. दरम्यान, आता याच महिन्यात अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पुढच्या महिन्यातदेखील केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.






