राज्यातील 29 महापालिकांचे निकाल आज लागणार आहेत. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सहा महापालिकांचा निकालही लागणार आहे. पाच ते आठ वर्षानंतर या महापालिकांची निवडणूक झाली. त्याचे निकाल आज येणार असल्याने या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. खासकरून या महापालिकेत भाजपची कामगिरी कशी होते? याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकालाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट जाणून घ्या.
पुण्यात शिवसेना ही निर्णयाक ठरणार असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
अजित पवार गेम चेंजर आहेत. आम्हाला उमेदवारी देताना उशिर झाला. राजकीय डावपेच करता आले नाही. नाहीतर पुण्यात चांगले निर्णय घेता आला असता. युतीमुळे आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागला, असंही त्यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांसाठी आभारपत्र लिहीलं आहे.
लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो असं अजित पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले .






