Saturday, January 24, 2026
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! फुले विकणाऱ्या चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार; रक्तस्त्राव सुरू झाला अन् .

संतापजनक! फुले विकणाऱ्या चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार; रक्तस्त्राव सुरू झाला अन् .

दिल्लीमध्ये माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली आहे. (flowers) ट्राफिक सिग्नलवर फूल विकणाऱ्या एका 11 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिला जंगलामध्ये नेले आणि तिच्यासोबत अत्याचार केला. दिल्ली पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली आणि एका रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या.

 

ही खळबळजनक घटना 11 जानेवारी रोजी घडल्याची सांगितले जात आहे. (flowers) पीडित मुलगी बच्ची प्रसाद नगरमध्ये एक चिमुकली गुलाबाचे फूलं विकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 40 वर्षीय आरोपी दुर्गेशने प्रवासींना सोडून झाल्यानंतर रिक्षा त्या मुलीजवळ थांबवली. ती फूलं दाखवण्यासाठी त्याच्याजवळ गेली आणि त्याने तिला सांगितले की हे सगळे फूलं मी तुला विकून देतो. ह्या चिमुकलीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि रिक्षामध्ये बसली.

 

पीटीआयच्या वृत्तानुसार आरोपी या मुलीला प्रोफेसर रामनाथ विज मार्ग येथील असलेल्या(flowers) जंगलामध्ये घेऊन गेला. या ठिकाणी या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. यामध्ये तिला रक्तस्त्राव सुरू झाला आणि ती बेशुद्ध झाली. पोलिसांनी सांगितले की, तिचा मृत्यू झाला असल्याचे त्याला वाटले आणि हा तेथून फरार झाला.मुलगी शुद्धीवर येताच ती घरी परतली आणि परिवाराने तिला रुग्णालयात भरती केले आणि झालेली घटना सांगितली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासची चक्रे फिरवली आणि या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -