Friday, January 30, 2026
Homeतंत्रज्ञान12GB RAM + 521GB स्टोरेज; बंपर डिस्काउंटसह Vivo ने लॉन्च केला नवीन...

12GB RAM + 521GB स्टोरेज; बंपर डिस्काउंटसह Vivo ने लॉन्च केला नवीन X200T

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Vivo ने भारतीय बाजारात आपला नवा प्रीमियम स्मार्टफोन Vivo X200T लॉन्च केला आहे. हा फोन 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च करण्यात आला असून, फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

 

दमदार फीचर्स आणि आकर्षक लॉन्च ऑफर्समुळे हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

Vivo X200 सीरिजमधील नवा फोन

 

Vivo X200T हा Vivo X200 सीरिजचा भाग आहे. या सीरिजमधील इतर दोन फोन आधीच बाजारात उपलब्ध आहेत. नवा X200T फोन AMOLED डिस्प्लेसह येतो आणि Android 16 आधारित Origin OS 6 वर कार्य करतो.

 

किंमत किती आहे?

 

Vivo X200T दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:

 

12GB RAM + 256GB स्टोरेज: ₹59,999

 

12GB RAM + 512GB स्टोरेज: ₹69,999

 

हा फोन सीसाइड लिलाक आणि स्टेलर ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

 

फोन सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, ग्राहक तो Vivo ची अधिकृत वेबसाइट, Flipkart आणि ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करू शकतात.

 

लॉन्च ऑफर्स

 

लॉन्च ऑफर अंतर्गत ग्राहकांना ₹5,000 इंस्टंट डिस्काउंट किंवा ₹5,000 एक्सचेंज बोनस, यापैकी एक फायदा मिळू शकतो. तसेच, हा फोन 18 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI पर्यायासहही खरेदी करता येणार आहे.

 

Vivo X200T चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स

 

डिस्प्ले: 6.67-इंच AMOLED, 120Hz रिफ्रेश रेट

 

पीक ब्राइटनेस: 5000 निट्स

 

प्रोसेसर: MediaTek Dimensity 9400+

 

रियर कॅमेरा:

 

50MP प्रायमरी

 

50MP अल्ट्रा-वाइड

 

50MP टेलिफोटो

 

फ्रंट कॅमेरा: 32MP

 

बॅटरी: 6200mAh

 

चार्जिंग: 90W फास्ट चार्जिंग, 40W वायरलेस चार्जिंग

 

सिक्युरिटी: इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -