Friday, March 27, 2026
Homeब्रेकिंगलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! eKYC साठी मुदत वाढवली; वाचा स्टेप बाय स्टेप...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! eKYC साठी मुदत वाढवली; वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना ईकेवायसीमध्ये चुक सुधारण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

 

आता महिलांना पुन्हा एकदा केवायसी करता येणार आहे. केवायसी करण्यासाठी मुदतवाढ वाढवून दिल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरेंनी घोषणी केली आहे.

 

 

आदिती तटकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई केवायसी दुरुस्तीची संधी ३१ मार्चपर्यंत असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला आहे.यामुळे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

 

या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.

 

केवायसीची प्रोसेस कशी असणार? (Ladki Bahin Yojana eKYC)

 

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.

 

तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या वेबसाइटवर जायचे आहे.

 

वेबसाइटवर तुम्ही ही संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत’यावर क्लिक करा.

 

यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याची उत्तरे द्यायची आहे.

 

यावेळी महिलांना योग्य उत्तरे द्यायची आहेत. कोणत्याही प्रकारची चुकीची उत्तरे दिल्यावर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -