Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रचांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?

चांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?

लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांबाबत सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या आठवडाभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून, चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत.

 

जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात आठवड्याभरात मोठी कपात

 

 

गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३,९८० रुपयांची घसरण झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ३,६५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,७५० रुपये आहे, तर मुंबईत हेच दर १,५६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले आहेत.

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):

 

शहर २२ कॅरेट (रुपये) २४ कॅरेट (रुपये)

मुंबई १,४३,५५० १,५६,६००

पुणे १,४३,५५० १,५६,६००

दिल्ली १,४३,७०० १,५६,७५०

चेन्नई १,४३,५५० १,५६,६००

बेंगळुरू १,४३,५५० १,५६,६००

 

चांदीच्या दरात ६५ हजारांची घसरण

 

 

सोन्यापेक्षाही चांदीच्या किमतीत झालेली घसरण अधिक धक्कादायक आहे. एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ६५,००० रुपयांची घट झाली आहे. ३० जानेवारी रोजी ४ लाखांच्या पार गेलेली चांदी आज प्रति किलो २,८५,००० रुपयांवर आली आहे.

भविष्यात वाढीचे संकेत

 

 

सध्या जरी किमती कमी झाल्या असल्या तरी, ‘जेपी मॉर्गन’च्या अंदाजानुसार वर्षाच्या अखेरीस सोने प्रति औंस ६,३०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते. मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे २०२६ मध्ये किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा दर प्रति औंस ५,०८७.७३ डॉलर असून चांदीचा दर ७४ डॉलर प्रति औंस आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -