Thursday, February 12, 2026
Homeराजकीय घडामोडी"घातपात असेल तर.", अजित पवारांच्या अपघातप्रकरणी पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर; राष्ट्रवादी विलिनीकरणावरही...

“घातपात असेल तर.”, अजित पवारांच्या अपघातप्रकरणी पहिल्यांदाच बोलले नाना पाटेकर; राष्ट्रवादी विलिनीकरणावरही केलं भाष्य

“अजित पवार माझ्या लहान भावासारखे होते, चांगले मित्र होते. मी त्यांना नेहमी मिस करेन”, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी भावना व्यक्त केल्या.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर नानांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात, दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि अजित पवारांसोबत असलेल्या नात्यावर नाना पाटेकरांनी भाष्य केलं.

 

सुनेत्रा पवार यांचे दु:ख इतरांपेक्षा वेगळं

 

“सुनेत्रा पवार यांचे दु:ख इतरांपेक्षा वेगळं आहे. ते त्यांनाच सहन करावं लागेल. पण, त्यांनी जो पदभार स्वीकारला आहे त्याची जबाबदारी देखील सांभाळावी लागेल आणि ती जबाबदारी त्या सांभाळतील, पण वेळ तर लागेलच”, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर भाष्य करताना म्हणाले.

 

अजित पवारांचा अपघात, घातपात असेल तर?

 

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत विविध प्रश्न उपस्थित केलेत. अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला, याबाबत नाना पाटेकरांना विचारण्यात आले. ‘रोहित पवारांनी काकांना गमावले आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील ते त्यांनी उपस्थित केले. आणि हा घातपात असेल तर ते सिद्ध होईल आणि सिद्ध झाले तर दोषींना शिक्षा मिळेल’, असे नाना म्हणाले. ‘अजित पवारांच्या अपघातासंबधित प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्याचे निराकरण देखील व्हायला हवं’, असेही नाना पुढे म्हणाले.

 

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर काय म्हणाले नाना?

 

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत बोलताना नानांनी तो त्यांचा निर्णय आहे असे म्हणत विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. ‘मला निर्णय घेता आला असता तर मी सांगितले असते, पण ते माझ्या हातात नाही’, असे नाना पाटेकर म्हणाले.

 

अजित पवार लहान भावासारखे

 

“अजित पवार १९ – २० वर्षांचे होते तेव्हापासून माझी त्यांची मैत्री होती. कार्यकर्ता म्हणून काम करत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. जिथून त्यांनी सुरुवात केली आणि ज्यापदापर्यंत झेप घेतली तो प्रवास कमालीचा होता. राजकीय सोडून द्या पण, त्यांना नेहमी मिस करेन माझ्या छोट्या भावासारखे होते अजित पवार, चांगले मित्र होते”, असे नाना पाटेकर म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -