Monday, December 23, 2024
Homeक्रीडाटीम इंडियाचा ‘कॅप्टन’ होताच केएल राहुलची अनोख्या ‘रेकॉर्ड’ला गवसणी!

टीम इंडियाचा ‘कॅप्टन’ होताच केएल राहुलची अनोख्या ‘रेकॉर्ड’ला गवसणी!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. संघाची धुरा सांभाळताच राहुलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. यात त्याने विराट कोहली मागे टाकले असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बरोबरी केली.

सर्वात कमी प्रथम श्रेणी सामन्यांचे कर्णधारपद भूषवल्यानंतर केएल राहुल कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार होण्यापूर्वी राहुलला केवळ एका प्रथम श्रेणी सामन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव होता.

महेंद्रसिंह धोनीने कसोटी संघाचे कर्णधार पद स्वीकारण्यापूर्वी केवळ एका प्रथम श्रेणी सामन्यात त्या संघाचे नेतृत्व केले होते. या यादीत पहिले स्थान अजिंक्य रहाणेचे आहे, जो प्रथम श्रेणीत कर्णधार म्हणून एकही सामना न खेळता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे.

दरम्यान, केएल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याची एकाग्रता भंगली आणि मार्को जेन्सनचा चेंडू स्टेडियमच्या बाहेर फटकावण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला. ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो बाद झाला. रबाडाने राहुलचा झेल टिपला. त्याने १३३ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -