Tuesday, May 21, 2024
Homenews36 लाखांवर डल्ला मारणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या

36 लाखांवर डल्ला मारणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

औरंगाबाद शहरातील सूर्या लॉन्समधील एका लग्नातून तब्बल 36 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारा चोर अखेर जेरबंद झालाय. 25 दिवसांनी पोलिसांनी अकोल्यातून या चोराच्या मुसक्या आवळल्या. अभिषेक विनोद भानुलिया (मूळ मध्य प्रदेश येथील रहिवासी) असे त्याचे नाव असून त्याला 7 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्समधील लग्नाच्या कार्यक्रमात झालेल्या मोठ्या चोरीमुळे शहरात खळबळ माजली होती.

शहरातील सूर्या लॉन्स येथे ही मोठी चोरी 6 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. सुनिल जैस्वाल या नागपूर येथील व्यापाऱ्याच्या मुलाचे नैमिष याचे लग्न औरंगाबादमधील संजय हिरालाल जैस्वाल यांच्या मुलीशी ठरले होते. 6 डिसेंबर रोजी सूर्या लॉन्सवर हळदीचा कार्यक्रम सुरु असताना सुनील जैस्वाल यांनी होणाऱ्या सुनेला गिफ्ट म्हणून डायमंड सेट दिला आणि उर्वरीत दागिन्यांची बॅग काही काळ एकका खुर्चीवर ठेवून ते नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले. हीच संधी साधत चोराने दागिन्यांची बॅग लंपास केली. लॉनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक मुलगा बॅग घेऊन लॉनच्या बाहेर जाताना दिसला. गेटच्या बाहेर एक कार उभी होती. मुलगा कारमध्ये बसला आणि कार निघून गेली होती.

त्यानंतर जवळपास 25 दिवसांनी पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून एका आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपी अभिषेख भानुलिया याला अकोल्यातील सिव्हिल लाइन पोलिसांनी अटक केली होती. त्यानेच औरंगाबाद, वर्धा, अकोल्यात लग्न समारंभात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांना याची माहिती देण्यात आली. आता पोलिस या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -