Thursday, April 2, 2026
Homeमहाराष्ट्रपालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते...

पालकांनो सावधान! वाढता स्क्रीन टाईम मुलांसाठी ठरतोय गंभीर आजारांचे कारण, 5 ते 16 वयोगटातील मुलांसाठी तज्ज्ञांचा इशारा

तज्ज्ञ सांगतात, आजकाल 5 ते 16 वयोगटातील मुलांमधील वाढता स्क्रीन टाइम हा लठ्ठपणा, झोपेच्या आणि आहारासंबंधी समस्यांचे कारण ठरतोय

 

आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये मोबाईल, टॅब, टीव्ही आणि इतर स्क्रीनचा वापर झपाट्याने वाढत असून (children) यामुळे लठ्ठपणा, झोपेच्या समस्या, खाण्याचे विकार, डोळ्यांवर ताण आणि वर्तणुकीतील बदल यांसारख्या समस्या वाढत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत डॉ. कोचुरानी अब्राहम ( बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट, अंकुरा महिला व बाल रुग्णालय, पुणे) यांनी महत्त्वाची दिली. ऑनलाइन क्लासेस, मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणांची सहज उपलब्धता यामुळे 5 ते 16 वयोगटातील मुले दिवसातून अनेक तास स्क्रीनसमोर घालवत आहेत. पालकांची व्यस्त दिनचर्या आणि मुलांना शांत ठेवण्यासाठी मोबाईल देण्याची सवय यामुळेही स्क्रीनवर अवलंबित्व वाढत आहे.

 

डॉ. अब्राहम सांगतात की, जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्यामुळे मुलांमध्ये शारीरिक हालचाल कमी होते, सतत काहीतरी खात एकाच जागी बसण्याची सवय लागते आणि त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. अनेक मुले दिवसभरात 3 ते 4 तास मोबाईल वापरत बसतात, व्यायाम टाळतात आणि त्यामुळे लठ्ठपणासारख्या आजारास बळी पडतात. स्क्रीन पाहून जेवल्यामुळे आपण काय खातोय, किती खातोय याकडे त्यांचे लक्ष जात नाही आणि (children) त्यामुळे खाण्याचे विकार तसेच पचनाच्या समस्या वाढतात. वाढत्या स्क्रीन टाईममुळे खेळणे, कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे प्रमाण कमी झाले असून याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नका.

 

 

 

त्या पुढे सांगतात की, वाढत्या स्क्रीन टाईमचा परिणाम मुलांच्या मेंदूच्या विकासावर, लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवर आणि भावनिक नियंत्रणावर होतो. (children) अशा मुलांमध्ये ब्रेन फॉग, विसरभोळेपणा, एकाग्रतेचा अभाव, गोंधळ, चिडचिड, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा अशा समस्या वाढतात. सोशल मीडियाचा अति वापर केल्याने मुले स्वतःची तुलना इतरांशी करू लागतात आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो.पालकांनी मुलांसाठी ठराविक दिनक्रम पाळावा, रोजचा स्क्रीन टाइम 1 ते 2तासांपर्यंत मर्यादित ठेवावा आणि वाचन, खेळ, चित्रकला, नृत्य, संगीत किंवा नवीन भाषा शिकणे यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. कुटुंबाने एकत्र स्क्रीन-फ्री वेळ घालवणे, घरात एकत्र बसून बैठे खेळ खेळणे, शैक्षणिक चित्रपट पाहणे आणि पालकांनी स्वतः स्क्रीन वापरावर नियंत्रण ठेवून मुलांसमोर आदर्श ठेवणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -