Sunday, April 5, 2026
Homeमहाराष्ट्रआता OTP विना व्यवहार, फसवणूक रोखण्यासाठी RBI चा रामबाण उपाय, ऑनलाईन फसवणुकीला...

आता OTP विना व्यवहार, फसवणूक रोखण्यासाठी RBI चा रामबाण उपाय, ऑनलाईन फसवणुकीला आळा

ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी आता ओटीपीवर (OTP) अवलंबून राहण्याची गरज (online payments) हळूहळू कमी होणार आहे. सायबर फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन बँका आणि टेलिकॉम कंपन्या “सायलेंट ऑथेन्टिकेशन” या नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे डिजिटल व्यवहार अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचा दावा केला जात आहे.

 

आजपर्यंत ऑनलाईन व्यवहार करताना ओटीपी ही महत्त्वाची सुरक्षा पायरी मानली जात होती. मात्र हॅकिंग, सिम क्लोनिंग आणि ई-सिम स्वॅपिंगसारख्या प्रकारांमुळे सायबर भामट्यांनी या प्रक्रियेतील उणिवांचा फायदा घेत ग्राहकांची फसवणूक केली. अनेक वेळा हॅकर्स ओटीपी मिळवून खात्यातील पैसे सहज काढून घेत असल्याने या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

 

या पार्श्वभूमीवर “सायलेंट ऑथेन्टिकेशन” ही प्रणाली समोर आली आहे. (online payments) ही एक बॅकग्राऊंडमध्ये काम करणारी सुरक्षा प्रक्रिया आहे. यामध्ये ग्राहकाच्या मोबाईलमधील सिम कार्ड, डिव्हाइस, नेटवर्क आणि इतर तांत्रिक माहितीची रिअल-टाईम पडताळणी केली जाते. टेलिकॉम कंपन्या आणि बँका एकमेकांशी तत्काळ माहिती शेअर करून व्यवहाराची खातरजमा करतात. त्यामुळे जर कुठे संशयास्पद हालचाल आढळली, जसे की सिम क्लोनिंग किंवा डिव्हाइस बदल, तर व्यवहार लगेच थांबवला जातो.

 

 

या नव्या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना ओटीपी टाकण्याची गरज कमी होईल, (online payments) त्यामुळे व्यवहार जलद पूर्ण होतील. त्याचबरोबर फसवणुकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. विशेषतः ई-सिमच्या वाढत्या वापरामुळे सुरक्षा अधिक मजबूत होईल, कारण प्रत्येक व्यवहारासाठी डिव्हाइस आणि नेटवर्कची खात्री केली जाईल. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनेही 1 एप्रिलपासून टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (2FA) अधिक कडक केले आहे. आता केवळ पासवर्डवर व्यवहार होणार नाही, तर दोन वेगवेगळ्या पद्धतींनी ओळख पटवूनच व्यवहार पूर्ण केला जाईल. त्यामुळे डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -