Monday, April 13, 2026
Homeमहाराष्ट्रतीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या...

तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?

गेली तीन वर्षे निष्क्रिय असलेली आणि शून्य शिल्लक असलेली बँक खाती 15 एप्रिलपर्यंत ॲक्टिव्ह न केल्यास ती बंद केली जातील. फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. आपले खाते बंद होण्यापासून वाचवण्यासाठी लवकरात लवकर जवळच्या शाखेत जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करा. कोणती आहे ही बँक ?

 

आजकाल प्रत्येक बँक खात्याचे व्यवहार ऑनलाइन होत असतात, त्यामुळे बँकिंगही सोपं झाल आहे. मात्र आता एकमा बॅकेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकचे ग्राहक असाल तर या बँक अकाऊंटबद्दल एक मोठा अलर्ट समोर आला आहे. 16 एप्रिलपासून काही खाती बंद केली जाऊ शकतात, असा खरं इशारा बँकेने मार्चमध्ये दिला होता. ही अशी खाती आहेत जी तीन वर्षांपासून निष्क्रिय आहेत, (Bank account) त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही आणि ज्यामधील शिल्लक ही शून्य आहे. जर तुमचं बँक खातं या कॅटॅगरीमध्ये येत असेल, तर पटापटा आवश्यक कारवाई करा, अन्यथा कोणत्याही सूचनेशिवाय हे बँक अकाऊंट बंद केलं जाईल आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते.

 

 

पीएनबीच्या ज्या खातेधारकांनी गेल्या तीन वर्षांत कोणताही व्यवहार केलेला नाही आणि ज्यांच्या खात्यात कोणतीही शिल्लक अथवा निधी नाही, त्यांच्यासाठी 15 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. या मुदतीपर्यंत ही बँक खाती ॲक्टिव्ह न केल्यास, ती बंद केली जातील. पंजाब नॅशनल बँकेने गेल्या महिन्यात, त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये एक महत्त्वपूर्ण इशारा देण्यात आला होता.

 

पीएनबीने एका एक्स-पोस्टद्वारे (पूर्वीच ट्विटर) सूचना जारी केली होती की, अशी निष्क्रिय खाती ठराविर वेळेत ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे. मात्र असं केलं नाही तर 16 एप्रिल रोजी ही खाती निष्क्रिय करण्याची कारवाई केली जाईल. खाती ॲक्टिव्ह कशी करायची, त्याची प्रक्रिया देखील या सोशल मीडिया पोस्टमध्ये, बँकेने सांगितली आहे.

 

पीएनबीचं असं खात पुन्हा ॲक्टिव्ह करणं खूप सोपं आहे. ज्यांचं या बँकेत अकाऊ्ंट आहे, ते खातेधारक 15 एप्रिलच्या डेडलाइनपूर्वी आपली खाती पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी जवळच्या बँक शाखेत जाऊ शकतात.( Bank account) तेथे जाऊन ‘नो युअर कस्टमर’ प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केवळ एक साधं केवायसी अपडेट पूर्ण करून किंवा व्यवहार पुन्हा सुरू करून खाते बंद होण्यापासून वाचवता येईल.

 

आता, पंजाब नॅशनल बँक अशी निष्क्रिय खाती बंद करण्याची कारवाई का करत आहे, हेही जाणून घेऊया. पीएनबीने आपल्या निवेदनात आधीच म्हटलं होतं की, या खात्यांशी संबंधित धोके कमी करणं हे यामागील कारण आहे. फसवणुकीच्या धोक्यामुळे, बँका अशा निष्क्रिय किंवा शून्य-शिल्लक खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ग्राहकांना त्यांच्या खात्याची स्थिती तपासण्यात काही अडचण आल्यास, (Bank account) त्यांनी त्यांच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -