Home महाराष्ट्र शाळेची तयारी करत असतानाच 10 वर्षाच्या मुलाला हार्टअटॅक अन् पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

शाळेची तयारी करत असतानाच 10 वर्षाच्या मुलाला हार्टअटॅक अन् पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

0

शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ईशान सत्यपाल आत्राम (वय 10 वर्षे) असे या मुलाचे नाव होते, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी शाळेत जाण्यासाठी उठला. शाळेत जाण्यासाठी त्याने आंघोळ आटोपली आणि शाळेचा गणवेश परिधान केला. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. गणवेश घालून शाळेची तयारी करत असतानाच सकाळी 7 वाजेच्या सुमारास ईशानला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला.

 

आत्राम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

 

ईशानच्या निधनाने आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देलनवाडी गाव सुन्न झाले आहे.