Saturday, April 25, 2026
Homeमहाराष्ट्रकामाची बातमी! मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद; नेमकं कारण काय?

कामाची बातमी! मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद; नेमकं कारण काय?

मे महिना सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, या महिन्यात बँकिंग संबंधित अनेक महत्त्वाचे बदल आणि सुट्ट्यांची मोठी यादी समोर आली आहे. त्यामुळे बँकेत कोणतेही (holidays) काम असणाऱ्यांनी आधीच नियोजन करून जाणे आवश्यक ठरणार आहे. मे महिन्यात विविध सण, राज्यनिहाय उत्सव आणि नियमित वीकेंड सुट्ट्या यामुळे देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे महिन्याच्या सुरुवातीलाच १ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिनामुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर लगेचच रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांना सलग सुट्टीचा म्हणजेच लाँग वीकेंडचा आनंद घेता येणार आहे.

 

याशिवाय महिनाभरात दुसरा आणि चौथा शनिवार, सर्व रविवार, तसेच विविध सण आणि जयंतीनिमित्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहेत. बकरी ईदसारख्या मोठ्या सणामुळेही देशातील बहुतांश भागात बँका बंद राहतील. त्यामुळे मे महिन्यात एकूण जवळपास १२ दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. परिणामी, आर्थिक व्यवहार, चेक क्लिअरन्स किंवा इतर बँकिंग कामांसाठी नागरिकांनी सुट्ट्यांची माहिती लक्षात घेऊनच आपले काम नियोजित करणे गरजेचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -